मोठी बातमी! ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

Gyanesh Kumar Elected as Chief Election Commissioner : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या (Election) निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाकडून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्री काढला. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असणार आहे.
कोण आहेत राजीव कुमार?
१९८८ च्या बॅचचे केरळ केडरचे आयईएस अधिकारी असलेल्या ज्ञानेश कुमार यांचा जन्म २७ जानेवारी १९६४ रोजी उत्तर प्रदेशच्या आगरा येथे झाला. वाराणसीच्या क्विन्स महाविद्यालय आणि लखनऊच्या काल्विन तालुकेदार महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर आयआयटी कानपूर मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले. आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर ते केरळच्या एर्नाकुलममध्ये ते सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांनी केरळमध्ये विविध पदांवर काम केले.
मोठी बातमी ! दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ज्ञानेश कुमार गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. तसेच अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते. तसेच राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या बाल रुपातील मूर्तीची निवड करण्याच्या मंडळातही त्यांचा समावेश होता.
ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्ताचीही निवड करण्यात आली आहे. १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडर डॉ. विवेक जोशी हे आता निवडणूक आयुक्त असतील. निवडणूक आयुक्त हा पुढे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त होतो, असा प्रघात राहिला आहे. ज्ञानेश कुमार हेदेखील राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत होते.
देशाचे २६ ने निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार या वर्षाच्या शेवटी बिहार विधानसभा निवडणूक आणि २०२६ साली केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवतील. याचवर्षी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Dr. Vivek Joshi, IAS of the 1989 batch, is appointed as Election Commissioner, with effect from the date he assumes charge of his office. pic.twitter.com/PcHYdgj1iU
— ANI (@ANI) February 17, 2025