Vidhansabha Election : जनताच आता कौरवी वृत्तीचा नायनाट करेल, रोहित पवारांचा महायुतीला इशारा
Rohit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास…’, अजितदादांचा सदाभाऊ खोतांना सज्जड दम
स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र असून त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला नेहमीच प्रोत्साहन दिले, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
महाराष्ट्रात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केवळ पैसेच नाही तर बंधुका शस्त्रसाठा सुद्धा वापरला जात आहे. हे कोणामुळे शक्य झाले असेल तर ते राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळे!
स्वतःला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धुतराष्ट्र असून त्यांनी… pic.twitter.com/1kcgtDRfK0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 6, 2024
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडवण्यासाठी रचण्यात आलेला कट मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 च्या पथकाने हाणून पाडला. पोलिसांनी या प्रकरणी 9 देशी पिस्तूल, 21 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करत 8 जणांना अटक केली आहे. हाच धागा पकडून रोहित पवारांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात आज निवडणुकीच्या पार्श्वभभूमीवर आता केवळ पैसेच नाही तर बंदुका, शस्त्रसाठी सुध्दा वापरला जात आहे. हे कोणामुळं शक्य झालं असेल तर ते राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक गृहमंत्र्यांमुळं, असं रोहित पवार म्हणाले.
मुलांना फ्री शिक्षण अन् बेरोजगार तरुणांना 4 हजार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
रोहित पवार यांनी पुढं लिहिलं की, स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र असून त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला नेहमीच प्रोत्साहन दिले. असो जनता आता राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करणारे सरकार स्थापन करून, अशा कौरवी वृत्तींचा नायना करेल, हा विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.