‘पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास…’, अजितदादांचा सदाभाऊ खोतांना सज्जड दम
Ajit Pawar on Sadabhau Khot : महायुतीच्या (Mahayuti) राज्यातील विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. आज जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा झाली. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शरद पवारांना महाराष्ट्र स्वत:च्या तोंडासारखा करायचा आहे का, असा सवाल खोत यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
सर्वांगीण विकास साधणार; मांजरीत पदयात्रेतून बापुसाहेब पठारेंचं आश्वासन
पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजितदादांनी दिला.
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 6, 2024
अजित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला.
मुलांना फ्री शिक्षण अन् बेरोजगार तरुणांना 4 हजार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळं त्यांचा जबडा काढण्यात आला. ऑपरेशननंतर काहीच दिवसांनी रक्तस्त्राव होत असतानाही ते उपस्थित राहिले. त्यामुळं आपण काय बोलतोय याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे . त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोळणं यावरून तुमची अक्कल शुन्यता लक्षात येते, अशी टीका आव्हाडांनी केली.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले ?
शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला. एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे… मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा… महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का, असा सवाल खोत यांनी केला.