…तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू; बाळा नांदगावकरांचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

…तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू; बाळा नांदगावकरांचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

Aaditya Thackeray : ठाकरे बंधु तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. (Thackeray) त्यामुळे निवडणुका सोबत लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू आशा बाळा नांदगावकरांनी युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

नांदगावकर बोलताना म्हणाले, आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ठाकरे बंधूंच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार ; वकील गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. कांदिवली पूर्वेतील समतानगर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिव संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं. शाखा क्रमांक 25 च्या वतीने माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या माध्यमातून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्यासंखेने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

काही ना काही या राज्यात घडत चाललं आहे. गृहखात काम करतय की नाही हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परवा चड्डी बनियन गॅंग मधील मुख्य मुक्केबाजावर काय कारवाई झाली? काल आमदार पैशाची बॅग घेऊन बसले काय कारवाई झाली? असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले. महाराष्ट्राच्या बाजूने आहे ते आम्ही करु बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube