Video: भुजबळांना मंत्री का केलं?, मुख्यमंत्री फडणवीसांचा काय आहे डाव? जरांगे पाटलांनी सगळच सांगितलं

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेली दोन वर्षापासून जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीवर थेट सरकारशी लढत आहेत. (Jarange) आता पुन्हा एकदा त्यांनी संघर्षाची वाट धरणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
यावेळी जरांगे पाटील यांनी भुजबळांना मंत्रिपद दिल्यावरूनही जोरदार प्रहार केले. राज्यावर असं कोणचं संकट कोसळलं होतं की छगन भुजबळ याला मंत्री करावं लागलं? असा थेट प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल असलेला द्वेष यातून पुन्हा एकदा दिसून आला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री केलं असा घणाघातही जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून महाराष्ट्रात दाखल, तब्बल १२ दिवस आधीच कोसळधारा
मराठा आरक्षणाला विरोध करून राज्यात पुन्हा मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण करायचा आणि दंगली भडकवायच्या असा फडणवीस यांचा डाव आहे. याआधी त्यांनीच छगन भुजबळ यांना राज्यभरात सभा घ्यायला लावल्या, त्यातून तलवारी काढण्याची भाषा करायला लावली. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांनाही हे आता कळायला लागलं आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
यावेळी जरांगे पाटील यांनी आमदारांनाही आवाहन केलं. ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आमदारांनाही माझी विनंती आहे, की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जातीय राजकारणाला बळी न पडता समाजाचं हित पहावं. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे कुठंलही भलं करू शकत नाही. त्यांना आणल्याने समाजाचा आणि सत्ताधाऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही. फडणवीस यांनी मराठा समाजाच्या लेकी-बाळींवर गोळ्या चालवल्या, लाठ्या चालवल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या असंही ते म्हणाले.