हगवणे कुटु्ंबियांना मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं..

हगवणे कुटु्ंबियांना मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं..

Devendra Fadnavis on Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एन्डला नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या त्या गोष्टी पोलीस करतील असे फडणवीस यांनी सांगितले.

या प्रकरणात आरोपींवर मकोका लावण्याची मागणी कस्पटे कुटुंबियांनी केली आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मकोका लावण्याकरता त्याचे काही नियम आहेत. त्या नियमात जर बसलं तर मकोका लागू शकेल. पण हे प्रकरण नियमात बसेल की नाही हे आज सांगता येत नाही. त्यावर बोलू शकत नाही. आजच्या काळात मुली आणि सुना यांच्यात खरंतर फरक करायला नको. पण आजच्या काळात अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं मला वाटतं हे पाप आहे असे फडणवीस म्हणाले.

अजितदादा हगवणे प्रकरणावर बोलताना गंभीर नव्हते; पत्रकाराचा प्रश्न अन् फडणवीस दादांसाठी बनले ‘ढाल’

अजितदादा गंभीरच आहेत..

एका कार्यक्रमात भाषण करत असताना अजितदादा लोकांना सांगत होते की मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो यात माझा काय दोष असे म्हणत असताना ते हास्य विनोदात रंगले. सरकार म्हणून गंभीर आहे पण अजितदादा त्यात गंभीर असल्याचं दिसत नाही, असे पत्रकाराने विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, अजितदादा गंभीर नाहीत असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कुणाकडे लग्नाला बोलावलं तर आपण जातो. त्यावेळी आपल्याला कल्पना नसते की पुढं काय घडणार आहे. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील यांनाही आज (शुक्रवार) अटक करण्यात आली.

Video : वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना बावधन पोलिसांनी अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळली प्रेस

follow us
  • fb
  • instagram
  • youtube