चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला

चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला

Sushant Shelar with CM Shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली. त्यानंतर आता सुशांत शेलार याच्यासह सिने आर्टिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मनोरंजन सृष्टीतील अडचणींची यादीच सादर केली. ( Sushant Shelar meet to CM Shinde for Issues of Marathi Cinema Industry )

View this post on Instagram

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

शरद पवार म्हणजे विरोधकांचा चेहरा; बंगळुरु बैठकीपूर्वी राऊतांचे मोठे विधान

काय आहेत मनोरंजन सृष्टीतील अडचणी?

सुशांत शेलार याच्यासह सिने आर्टिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोरंजन सृष्टीतील अडचणी मांडल्या त्यामध्ये त्यांनी काहीम मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये
1.फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे मनोरंजन क्षेत्रासाठी आखून दिलेल्या कार्यप्रणालीचं (SOP) कठोर पालन केलं जावं.
2. टेलिव्हिजन वर काम करणाऱ्या कलावंतांना 90 दिवसांनी मानधन मिळतं ते 30 दिवसांच्या आत दिलं जावं.
3. उपजीविकेसाठी केवळ कलाक्षेत्रावरच अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना लघुउद्योगाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
4. महिला आणि बालकलाकार यांच्या चित्रीकरणाच्या वेळेचे कटाक्षाने पालन करण्यात यावे.
5. एखादी मालिका कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेल्या वेळेच्या आधी बंद झाल्यास निर्मात्याला संबंधित वाहिनींकडून नुकसान भरपाई देण्यात यावी.
6. कलावंत,तंत्रज्ञ यांना विमा कंपन्यांकडून विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे.
7. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांच्या तालमीसाठी महानगर पालिकेकडून माफक दरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

Jar Tar Drama: अखेर १० वर्षानंतर प्रिया-उमेशने दिली गुड न्यूज! नव्या नाटकाची पहिली झलक समोर 

या मागण्या मनोरंजन सृष्टीकडून मुख्यमंत्री शिंदेंकडे करण्यात आल्या आहेत. तर या भेटीसंदर्भात बोलताना अभिनेता सुशांत शेलार म्हणाला की,
‘अनेक मुद्द्यांवरती मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली आणि त्यांनी या अडचणी सोडवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. लवकरच सिने सृष्टीतील सबंधित व्यक्तींसोबत यासंदर्भातल्या बैठकीचे आयोजन केले जाईल.आम्हाला ठाम विश्वास आहे. महायुतीच्या सरकारकडून कलाक्षेत्रातील अडी अडचणींवरती निश्चित उपाययोजना केली जाईल. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुखमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार.’

दरम्यान शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली आहे. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली. शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता, लेखन, अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube