शरद पवार म्हणजे विरोधकांचा चेहरा; बंगळुरु बैठकीपूर्वी राऊतांचे मोठे विधान

शरद पवार म्हणजे विरोधकांचा चेहरा; बंगळुरु बैठकीपूर्वी राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut On Sharad Pawar :  महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. त्याचवेळी देशातील विरोधी पक्षांची बैठक बंगळुरु येथे सुरु होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाणार आहे. पण, आजच्या बैठकीसाठी शरद पवार जाणार नसल्याची चर्चा होती. यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत याविषयी भाष्य केले.  (Sharad Pawar and Sanjay Raut Opposition Meeting )

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मी स्वत: बैठकीला जाणार आहे. शरद पवार यांच्याविषयी संभ्रमाचे वृत्त देण्यात आले की ते येणार नाहीत. पण माझा त्यावर अजितबात विश्वास नाही. कारण, या विरोधकांच्या आघाडीचा चेहरा जर कोणी असेल तर ते शरद पवार असतील. आज सकाळी आमची फोनवर चर्चा झाली. ते म्हणाले की, आज विशेष कामाचा अजेंडा दिसत नाही, ते उद्या सकाळी साडेदहा वाजता ते बंगळुरुला पोहचत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार बैठकीला असणार आहे.

https://letsupp.com/maharashtra/big-changes-again-in-shindes-cabinet-the-responsibility-of-five-ministers-increased-68510.html

ते पुढे म्हणाले की, त्यांचा पक्ष संकटात आहे. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे त्यांची आज येथे गरज आहे. परंतु, उद्या सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ते बंगळुरुत दाखल होतील, असंही त्यांनी सांगितलं.

Onion Price: टोमॅटोने महागल्याने सरकार सावध, लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा साठवला

तसेच अब्बास अन्सारी नावाचा महात्मा त्यांनी घेतला. मुख्तार अन्सारी नावाची एक पर्सनालिटी जे सध्या तुरुंगात असून त्यांना आजन्म कारावासची शिक्षा झाली. त्यांचे चिरंजीव अब्बास अन्सारी यांना एनडीएत घेतलं. त्यामुळे त्यांची वॉशिंग मशिन जवळजवळ फुटली. त्यांच्यावरही ईडीची कारवाई सुरू होती. काल ज्यांना मातीत मिळवण्याची भाषा करत होतात, त्यांना आज त्यांच्या चरणाशी जागा दिली, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube