Jar Tar Drama: अखेर १० वर्षानंतर प्रिया-उमेशने दिली गुड न्यूज! नव्या नाटकाची पहिली झलक समोर 

Jar Tar Drama: अखेर १० वर्षानंतर प्रिया-उमेशने दिली गुड न्यूज! नव्या नाटकाची पहिली झलक समोर 

Jar Tar Marathi Drama Story: प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘क्युट कपल’ (Cute couple) म्हणून ओळखले जात असतात. या ‘क्युट कपल’ने (Jar Tar Marathi Drama Story) देखील आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे चांगलेच उंच शिखर गाठल्याचे दिसून येत आहे. हिंदीमध्ये आपली दर्जेदार अशी ओळख निर्माण करत असताना प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात देखील प्रवेश केला. परंतु उमेश देखील अनेक माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला सतत येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख अगदी वेगाने वर जात असताना दिसून येत असतो. तसेच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र बघण्याची खूप इच्छा होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)


परंतु आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण एका दशकानंतर हे ‘क्युट कपल’ पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र दिसणार आहेत. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची ही हिट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव ‘जर तर ची गोष्ट’ असे असल्याचे सांगितले जात आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले आहे. इरावती कर्णिक यांनी याचे लेखन केले आहे. तर ‘जर तर ची गोष्ट’चे निर्मात्याची धुरा नंदू कदम यांनी सांभाळली आहे.

या नाटकामध्ये प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या रंगमंचावर एकत्र काम करण्याबद्दल प्रिया बापट म्हणाली की, ”हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक असणार आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि ते देखील आपल्या आवडत्या सहकलाकाराबरोबर ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. पुढे म्हणाले आहे की, हा माझा हट्ट आणि इच्छा होती. माझं पुढील नाटक देखील उमेशबरोबरच असाणार आहे. यासाठी आम्ही फार वाट बघितली आहे. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

आता लवकरात लवकर चाहत्यांच्या भेटीला येण्याची उत्सुकता लागली आहे. उमेश प्रियासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने सांगितले आहे की, ”नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकामध्ये जगताना आपल्याला दिसणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र एक सिनेमा केला आणि वेबसीरिज केली आहे. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की, एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग देखील जुळून आळ्यचाहे त्याने यावेळी सांगितले आहे. यामुळे प्रचंड उत्सुकता लागली आहे. मुख्य म्हणजे सोनल प्रॅाडक्शन सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube