अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक
Abhishek Bachchan : आजकाल मराठी असो, हिंदी असो की दाक्षिणात्य.. अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्ष (Samajwadi Party) अभिषेक यांना उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. हे वृत्त आल्यानंतर आता अभिषेकही आपल्या आई-वडिलांसारखं राजकारणात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते. (Abhishek Bachchan to join Samajwadi Party He Will contest the 2024 Lok Sabha elections)
अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर जया बच्चन या सध्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य आहेत. तर आता मीडिया रिपोर्टनुसार, आता अभिषेक बच्चनही समाजवादी पक्षात सामील होणार आहेत. इतकंच नाही तर तो 2024 ची लोकसभा निवडणूकही केवळ समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
दरम्यान, या वृत्तानंतर अभिषेकने 10 वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तो राजकारणात येण्याबाबत बोलताना दिसत आहे. 2013 सालच्या या मुलाखतीत जेव्हा अभिषेक राजकारणाबद्दल बोलला होता तेव्हा तो म्हणाला होता, ‘माझे आई-वडील राजकारणात आहेत पण मी राजकारणात जाणार नाही. मी पडद्यावरच राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसू शकतो, पण खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीही राजकारणात जाणार नाही, असं अभिषेक बोलला होता.
भाजपविरोधात ‘आप’ला कॉंग्रेसचा हात; केंद्र सरकारच्या त्या अध्यादेशाला दर्शवला विरोध
उत्तर प्रदेशातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याच्या शक्यतेवर समाजवादी पक्षाचे राज्य नेतृत्व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया घेत आहे. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लवकरच मुंबईत जाऊन अमिताभ बच्चन आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांची भेट घेऊ शकतात, अशीही शक्यता आहे.
अभिषेक सध्या न्यूयॉर्कमध्ये
10 वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने राजकारणात येण्याची शक्यता नाकारली होती. पण, समाजवादी पक्षाच्या ताज्या घडामोडींवर तो अद्याप काहीही बोललेले नाहीत. अभिषेकशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तो सध्या न्यूयॉर्कमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
अमिताभ जवळपास तीन वर्षे खासदार होते
महानायक अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये अभिनयातून ब्रेक घेऊन राजकारणात नशीब आजमावलं होतं. काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबादमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव त्यांनी केला होता. जुलै 1987 मध्ये अमिताभ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
जया बच्चन 2004 पासून खासदार
जया बच्चन यांनी 2004 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि पहिल्यांदाच प्रयत्नात त्या खासदार बनल्या. सलग चारवेळा त्या राज्यसभा सदस्य राहिलेल्या आहेत. 2018 पासून त्यांची चौथी टर्म सुरू आहे.