Download App

हातात सलाईन, शरीर थकलेलं! जरांगे पाटलांनी नारायणगड गाजवला, शेतकऱ्यांसाठी तोफ डागली…

बीड जिल्ह्यातील नारायणगड मनोज जरांगे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा पार पडला.

Manoj Jarange Patil Narayan Gad Dasara Melava : बीड जिल्ह्यातील नारायणगड मनोज जरांगे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा पार पडला. साधेपणाने होणार असल्याचे सांगूनही हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव या मेळाव्यासाठी एकत्र जमले होते. विशेष म्हणजे, मेळाव्याच्या आदल्या दिवशीच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तब्येत अजून पूर्णपणे ठिक नसतानाही जरांगे यांनी मेळाव्यासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांचा चेहरा थकलेला दिसत होता. एका हाताला सलाईनची सुई लावलेली असतानाच ते लोकांसमोर आले. चालताना आणि उठताना त्रास होत असूनही त्यांनी जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित केलं.

ओला दुष्काळ जाहीर करा

सारखं आडनाव असणाऱ्यांनी त्यांना फोन (Manoj Jarange Patil) करा. ते तुमची भावकी आहेत. तुमचे आणि त्यांचे नातेसंबंध आहेत. तुमचं अन् त्याचं कुळ एक आहे. अशा लोकांनी अर्ज करा, दिवाळीपर्यंत सर्व अर्ज दिलेले पाहिजे. जर त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्याच्याकडून लिहून घ्या. हा माझा भावकीतला आहे, याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र (Narayan Gad) द्या. प्रत्येक सेतु केंद्रावर स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे, तो काढून आणा. ते कागदं घेवून तहसीलदारकडे जा, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. मराठवाडा अन् लगतच्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा, त्याशिवाय माघार नाही. सरकारने हे काम दिवाळीच्या आत करायचं आहे. सत्तर हजार रूपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई (Dasara Melava) द्यायची. शेतकऱ्यांची आता खरी फाईट सुरू झाली. ज्यांचे पीकं जळली आहेत, त्यांना. ज्यांचे शेत अन् पीक वाहून गेलं, त्यांना एक लाख तीस हजार रूपये भरपाई द्यायची, ज्याचे जनावरं, सोयाबीन वाहून गेलं, त्यांना शंभर टक्के भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. संपूर्ण कर्जमुक्ती. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या. शेतीमालाला हमीभाव द्यायचा. शेतीला नोकरीचा दर्जा द्या, हे दिवाळीपर्यंत केलं नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांना बैठकीला बोलवू. किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू, असंही मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय.

मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षण दिलं नाही. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर जिल्हा परिषदला एकही सरकारचं सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. मंत्र्‍यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही – मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

 

मला बोलायला खूप त्रास होतोय

जरांगे यांनी या वेळी खुर्चीवर बसूनच समाजाशी संवाद साधला. त्यांच्या निर्धार आणि जिद्दीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणाऱ्या जरांगे यांच्या या मेळाव्यासाठी हजारो समर्थक उपस्थित होते. मला बोलायला खूप त्रास होतोय. गड नगद असल्यामुळे खूप ताकद मिळत आहेत. मला जशी मिळाली, तशी माझ्या शेतकऱ्याला देखील ताकद मिळाली. पाच-सहा महिन्यांपूर्वी मी सांगितलं होतं, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. आपण मुंबईला जायची हाक दिली, मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे, सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकरांचं कल्याण करू द्या, मुंबईला चला. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला पाहायचं होतं, मागं हटू नका असं सांगितलं होतं.

शेतीबरोबर आरक्षणाचा आधार

तुम्ही मुंबईला साथ दिली. अन् मराठ्यांनी जीआर घेऊन लढाई जिंकली. आता मला चिंता राहिली नाही. थोड्या दिवसांचा पाहुणा असु किंवा जास्त दिवसांचा. गरिब मराठा समाज खूप होरपळत होता. तो बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही, समाजाला खोटं बोललो नाही. एखाद्या वेळेस एक-दोन पावलं मागे सरकलो असलं, एखादी अर्धी चूक झाली असेल, पण मला दिसत होता समाज खूप तडफडत होता. शेतीबरोबर आरक्षणाचा आधार देणं गरजेचं होतं.

फक्त टीव्हीवर बोलले, पांढरे कपडे घातले

सहा करोड मराठ्यांचे लेकरं सुखी -समाधानी राहावे, अशी अपेक्षा होती. आता मला काही वाटतं नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र अन् हैद्राबाद म्हणजे मराठवाडा. दुसरे तर विरोधात गेले, आपल्यांनी तिथं राहायला नको होतं. जीव धरणीला टेकला तरी मागे हटलो नाही, हे फितुरांनी समजून घ्यायला हवं होतं. लढणारा मी आहे, माझा समाज आहे. तुम्हाला विकून तुमच्या रक्ताशी मी गद्दारी केली असती, तरी तुम्ही गद्दारी करायला हवी होती. आमच्यासोबत तर नाहीच पण जे मिळालंय, त्यात पण समाधान व्यक्त करू देत नाही. 45 वर्षांची लढाई, यांना काहीच करता आलं नाही. फक्त टीव्हीवर बोलले, पांढरे कपडे घातले. यातच यांनी मर्दानगी जाणवली. एका वर्षात तीन कोटी मराठे आरक्षणात घातले.

घरात घुसून हाणायची ताकद

दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. जे मिळालंय ते पण खूप मिळालंय, असं देखील यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. उतावळं वागायचं नको, असंही त्यांनी समाजाला उद्देशून म्हटलं आहे. थोडं हुशारीने चला, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं अन् प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीने शासक बना अन् प्रशासक बनवा. जातीला सांभाळायचं असलं, तर शेतात काम करता-करता शासक बनायचं डोक्यात राहू द्या. देशाच्या इतिहासातील हा पहिला दसरा मेळावा आहे, जिथे नारायण गडावरून शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आहे. खूप सहन केलं, आता घरात घुसून हाणायची ताकद असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

follow us