ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; मुंबई महानगरपालिकेने दिली परवानगी

Dasara Melava उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाली आहे.

UBT Dasara Melava at Shivaji Park

UBT got permission grant for Dasara Melava at Shivaji Park by BMC : दसरा हा सण जवळ आलाय. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. कारण दसरा या दिवशी अनेक राजकीय पक्षांचे दसरा मेळावे (Dasara Melava) असतात. यामध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यासाठी गुरुवारी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचबरोबर उबाठा आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीमुळे हा मेळावा चांगलाच गाजणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिली परवानगी

दरम्यान दसरा मेळाव्याच्या या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी. यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून मुंबई महापालिकेची पत्रव्यवहार करण्यात आला होता. आता या पत्रव्यवहार महापालिकेकडून उत्तर देण्यात आलं असून यामध्ये मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. यावर पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी हा मेळावा भूतो न भविष्यातील असा असेल असं सूचक विधान केलं आहे.

कुणाला धनलाभ तर कुणाला आरोग्य समस्या; जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी वरळी डोम आणि आझाद मैदान या दोन्ही जागेची पाहणी सुरू होती. यामध्ये त्यांनी आझाद मैदानात हा दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वरळी डोम या ठिकाणी जागा कमी पडू शकते. यामुळे शिवसेनेकडून आझाद मैदानाला प्राधान्य देण्यात आल्याचा सांगण्यात येत आहे.

नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या GenZ मध्ये फूट, दोन गटात तुंबळ हाणामारी; अनेकजण जखमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube