Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्री व विरोधक हे शेतकऱ्यांची बांधावर जावून त्यांचे सांत्वन केले जात आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही गुरुवारी बीड (BEED),धाराशिवचा दौऱ्या करत शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. तसेच पत्रकार परिषदेत सरकार आणि केंद्र सरकारवरही टीका केली. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करावी. मुख्यमंत्र्यांना विचारतो, तुमची योग्य वेळ ही पंचांग काढून सांगणार आहात का ? मुहूर्त काढून कर्जमाफी करणार आहात का असा सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांना केलाय.
खडसेंना दिलासा!प्रांजल खेवलकरांना कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी 2 महिन्यांनतर जामीन मंजूर
उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात यात राजकारण आणून नका. मीही राजकारण आणत नाही. सरकारकडून होणारे मदत तूटपुंजी असेल तर ती मदत स्वीकारता येणार नाही. या प्रकारचे संकट बराच वर्षानंतर आले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. पिके सडले आहेत. घरे, जनावरे वाहून गेले आहेत. सरकारची मदत तूटपुंजी आहे. एकरी साडेतीन ते चार हजार रुपये मदत दिली आहे. ही एक प्रकारे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. पंजाबमध्ये असेच संकट आले होते. तेथील आप सरकारने मदत जाहीर केलीय. पंजाब हेक्टरला 50 हजार मदत करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राने अशी मदत दिली पाहिजे. काहीच हरकत नाही. मी राजकारण आणत नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लाडक्या बहिण योजनेवर 45 हजार कोटी खर्च करतोच आहे. ही मस्ती आहे. 45 हजार कोटी वर्षाला खर्च करत असाल, त्यातील घोटाळे एक-एक बाहेर येत आहेत. लाडक्या बहिण योजनेतील दीड हजार रुपयांतून आता घर सावरणार आहेत का ? असा सवाल ठाकरे यांनी केलाय.
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही; भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा
बँकेच्या नोटीसा शेतकऱ्यांना आल्यात, अन्यथा शिवसेना रस्त्यावर
पीक विमा हा घोटाळा आहे. बँकेच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीसा एकत्र करून नजिकतच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या. पुढे काय करायचे ते मी बघतो. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी केली आहे. सरसकट कर्जमुक्तीची आता गरज आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगतात आम्ही योग्यवेळी कर्जमाफी करणार आहे. २०१९ निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी दिले होती. परंतु त्यात अनेक अटी घातल्या होत्या. शेतकरी म्हणाले होते, गळफास लावून घेतो. पण तुमची कर्जमाफी नको, असे शेतकरी सांगत होते. मुख्यमंत्र्यांना विचारतो, तुमची योग्य वेळ ही पंचांग काढून सांगणार आहात का ? मुहूर्त काढून कर्जमाफी करणार आहे. कर्जमाफी मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांबरोबर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
बिहारला मदत महाराष्ट्राला का नाही ?
केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. बिहार निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये स्वतःहून खात्यात टाकल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करायची जबाबदारी घ्यायची आहे. किती पैसे, कुठून पैसे द्यायचे आहे. जेव्हा कोरोनाचे संकट आले होते. त्यावेळी पीएम केअर फंड निर्माण केला गेला होता. त्याचा मायबाप कोण अजून कळलेले नाही. कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये गोळा केले होते. पीएम केअर फंड आता वापरा नाही तर कुणाची केअर घेता आता. पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा किंवा हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे. या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी विश्वगुरु म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
पीएम केअर फंडातून भरघोस शेतकऱ्यांना मदत करावी. जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आता येणार नसाल तर ती कधी येणार आहे. पीएम कुणाचे केअर घेतातय हे कळू द्या, असे ठाकरे म्हणाले.