Download App

Video : पहिले ओपन चॅलेंज अन् आता नरमेची भाषा; कासले ‘कराड’ स्टाईलनं शरण येणार?

  • Written By: Last Updated:

बीड : मी दररोज दोन गाड्या वापरुन लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasale) यांनी केला होता. मात्र, एकप्रकारे पोलिसांनाच चॅलेंज देणाऱ्या कासलेची भाषा अवघ्या काही तासाच नरमेची झाली असून, आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे कासलेंनी नव्या व्हिडिओत म्हटले आहे. कासलेंच्या या व्हिडिओमुळे ते वाल्मिक कराड (Walmik Karad) स्टाईलनं पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Suspended Police Officer Ranjeet Kasle New Video)

धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा धक्कादायक दावा

काल थेट पोलिसांना दिलं होतं चॅलेंज 

काल (दि.15) रणजीत कासने यांनी बीड पोलिसांना थेट चॅलेंज दिलं होतं. यात त्यांनी मी 20 वर्षे सायबर पोलीस दलात काम केले आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही. मी दररोज दोन गाड्या वापरुन लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही असे म्हणत चॅलेंज दिले होते. मात्र, आता नव्या व्हिडिओत त्यांनी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे म्हटले आहे.

Ranjeet Kasle on Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी एन्काऊंटरची ऑफर दिली... | LetsUpp Marathi

नव्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले कासले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये रणजीत कासले यांनी आपण बीड पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी कालपासून काही लोकांच्या कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो. वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा मला असं जाणवलं की, आता पळून उपयोग होणार नाही.

सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही

पुढे कासले यांनी मी आजपर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. त्यामुळे आताही मी परिस्थितीचा सामना करणार आहे. मी बीड पोलिसांना शरण जाणार आहे. सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही. या सगळ्यात माझा बळी जाणार, हे मला माहिती झाले आहे. मी पोलीस डिपार्टमेंटचं मीठ खाल्लं आहे. मी जे जे आरोप केले ते मी सिद्ध करुन दाखवेन, असे रणजीत कासले याने व्हिडीओत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड याने देखील पोलिसांना शरण येण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कराड पुणे पोलिसांसमोर शरण आला होता.

फेक एन्काऊंट कसा करतात?, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची… कासलेंचे खळबळजनक दावे

आता कराडच्याच पावलावर पाऊल ठेवत रणजीत कासले यांनीदेखील आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा कासले यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता तेच कासले कराड स्टाईलनं पोलिसांसमोर शरण येणार आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कासले यांनी ते नेमके कधी पोलिसांना शरण येणार आहेत याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता ते कधी पोलिसांसमोर शरण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us