छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे येत्या शुक्रवारी (30 मे) सकाळी 9.30 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुश कदमतर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यवाही पार पडते.
एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! नाशकात ठाकरेंचा माजी आमदार फोडला; भुजबळांनाही शह देणार?
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी पुढीलप्रमाणे: साहित्य – विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा), इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी), क्रीडा – ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या), हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे), ज्योती वाय. एल. (मुंबई), उद्योजक जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे), तसेच रंगमंचीय कलाविष्कार विभागात कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला), तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य), ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत), कल्पेश समेळ, रायगड (नाट्य) असे एकूण 16 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. 21 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, डॉ. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके, वैशाली बावस्कर, संतोष मेकाळे आदींनी केले आहे.
मोठी बातमी! आता शेतीत दरवर्षी 5 हजार कोटींची भांडवली गुंतवणूक; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा