Download App

मोठी बातमी! उरणमधील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. या ठिकाणी सर्व यंत्रणा दाखल झाल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Uran Fire : उरणमधील ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आमि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आमदार रोहित पवारांनी मंत्री बावनकुळेंची केली कोंडी,ते आव्हान स्वीकारत दिलं प्रतिआव्हान

उरणधील ओनजीसी प्रकल्पात मोठी आग लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच प्रकल्पाच्या प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

ही आग लागल्यामुळे संपूर्ण उरण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us

संबंधित बातम्या