Eknath Shinde Health Update :राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. (Eknath Shinde) पण, अद्यापही शिंदेंना विश्रामाची गरज असल्याने त्यांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. तसंच, नेत्यांच्या भेटीगाठीही टाळल्या आहेत. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत जो पेच निर्माण झाला आहे, त्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी कोट तयार
गिरीश महाजन म्हणाले, एकनाथजींची तब्बेत खराब होती, थ्रोट इन्फेक्शन आहे , ताप देखील आहे. तब्बेतीचा विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. तीन चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो ते गावी निघून गेल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क झाला नाही. युतीमध्ये सगळं काही अलबेल आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथजी यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्बेत ठीक होईल त्यानंतर ते बैठक देखील घेतील.
मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो
माझी त्यांच्याशी मंत्रिमंडळाबाबत कोणतेही चर्चा झाली नाही. हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. माझी एक शब्द देखील याबाबत चर्चा झाली नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तेच बोलले सहा डिसेंबरच्या तयारी बाबत बैठक आहे, ते बरे होतील. अजूनही त्यांना सलाईन लावलेलं आहे. उद्या पासून एकनाथजी स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील. आम्ही सगळे एकत्र आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार दिल्लीत
सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत व मंत्रीपदे अधिक मिळावीत, अशी पवार यांची भूमिका आहे. महायुतीला बहुमत मिळताच अजित पवार यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी गेले चार दिवस फारच ताणून धरल्याने भाजपचे नेतृत्व अजित पवारांना झुकते माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही.