Gutami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Mess in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा […]

Gautami Patil

Gautami Patil

Mess in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गर्दीने धिंगाणा घातल्याचे दिसून आले आहे. तर काही वेळेला कार्यक्रमाच्या ठिकाणी अपघात झाल्याचे देखील दिसले आहे.

यावेळी देखील असाच प्रकार पुन्हा एकादा घडला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव जवळच्या कळंबी गावामध्ये सोमवारी रात्री गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकंनी चांगलाच धुडगूस घातला. गौतमीतचं नृत्य सुरू असताना कार्यक्रमात काही तरूणांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.

यावेळी पोलिसांनी या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यावेळी पोलिसांनी काही हुल्लडबाजांना ताब्यात घेत तातडीने गौतमीचा कार्यक्रम बंद केला.

गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण

दरम्यान नुकतचं गौतमीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

Gautami Patil नाचत असतानाच तरुणांकडून…. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटलं

नृत्यांगना गौतमी पाटीलचा सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) बार्शी तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमीने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. मात्र, गौतमी ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री थेट 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला.

विशेष म्हणजे गौतमीला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केला. दरम्यान या प्रकरणी गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात बार्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड यांनी आरोप केला आहे.

Exit mobile version