पुरावे नसतानाही बातम्या चालवतात अन्… मंत्री चंद्रकांत पाटील भडकले

Chandrakant Patil : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

Chandrakant Patil

Chandrakant Patil

Chandrakant Patil : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत माझा आणि मुरलीधर मोहोळ यांचा कुठलाही गुन्हेगाराशी संबंध नाही आणि भारतीय जनता पक्ष कधीही कोणत्याही गुन्हेगाराला समर्थन करणार नाही असं म्हटले आहे. तसेच निलेश घायवळ आणि माझे संबंध आहेत याविषयी कोणाकडे पुरावे आहेत का की फक्त धंगेकरांकडे आहेत ? असं म्हणत त्यांनी माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांवर हल्लाबोल केला.

माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, आम्हा दोघांनाही पहिल्यांदा हे सांगायचंय की आमचा कुठलाही गुन्हेगाराशी संबंध नाही. अनेकदा मला दोन दोन तीन हजार लोकांना भेटावं लागतं त्यावेळी अनेकदा माहिती असून किंवा नसूनही फोटो काढले जातात. कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भाजप (BJP) नाही. आम्ही पोलिसांना सांगितले कोण कशातून पैसा कमावतो याचा तपास करा त्यानंतर त्यांची वाढलेली संपत्ती याची ईडीकडे तक्रार करा. येता आठवडाभरात पोलीस गुन्हेगारांच्या नावासह ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत असं माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवा, नाटक करत असेल किंवा येत नसेल तर दिवसभर बसून ठेवा. मानसिकरित्या गुन्हेगारांवर तुमचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करा असं देखील पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

निलेश घायवळ आणि माझे संबंध पुरावे आहेत का?

तर माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर (Ravindra Dhangekar) बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निलेश घायवळ आणि माझे संबंध आहेत याविषयी कोणाकडे पुरावे आहेत का की फक्त धंगेकरांकडे आहेत ? तर मी वरिष्ठ मंत्री असताना अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळे आब्रू नुकसानी सजावट ठोकायला हवा. तुम्ही फक्त माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. आमच्याशी पंगा असेल तर आमच्याशी लढा, शहराची बदनामी का करता? मी गिरणी कामगाराचा मुलगा तर मग समीर पाटील माझ्याकडून नोकरीला कसा असेल ? निलेश घायवळला पासपोर्ट घेण्यास मदत कोणी केली याचं नाव का घेत नाहीत ? सचिन घायवळला शस्त्र परवाना कोणी दिला ते नाव समोर आलं मात्र मी त्यांची नाव घेणार नाही. केवळ धंगेकर आणि चंद्रकांत पाटील हे नाव घेतलं जातंय. असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

धंगेकरांच्या विरोधात बातम्या का नाही?

धंगेकरांच्या विरोधात गणेश बिडकरांनी एवढे पुरावे दिले पण त्या बातम्या तुम्ही चालवल्या नाहीत, माझ्या विरोधात एकही पुरावा नाही पण तुम्ही बातम्या चालवता. काही कारण नसताना मुरलीनंतर जैन समाजाच्या जागेच्या बाबतीत बदनाम केलं, पण त्यांना त्याने काही फरक पडणार नाही असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Exit mobile version