Nitesh Rane : राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली बाजारपेठेत सुरु (Kankavali Market) असणाऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकली आहे. गुरुवारी कणकवली शहातील बाजारपेठेतील मटाक अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली. माहितीनुसार, बाजारपेठेत घेवारी नामक नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली. या कारवाईत घेवारी नामक व्यक्तीसह नऊ ते दहाजण मटका घेताना आले आढळून.
मंत्री नितेश राणे यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही कल्पना न देता मटाक अड्ड्यावर धाड टाकल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या कारवाईनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरु केली.
‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, ‘या’ दिवशी होणार रिलीज
पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणेंनी स्वतः जाऊन केलेली ही पहीलीच धडक कारवाई आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित ‘नाट्य परिषद करंडक 2025’; 15 संघ सहभागी