Download App

अबू आझमींनी आगीत तेल ओतलं! औरंगजेब तर म्हणे सेक्युलर…

सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. त्यावरुन राज्यात वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. अशातच आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंजेबाच्या समर्थनात ट्विट केल्याने खळबळ उडालीय.(Abu Azmi’s letter in support of Aurangzeb)

अबू आझमी ट्विटमध्ये म्हणाले, “मी औरंगेजब रमतुल्लाहसोबत आहे. त्यांचा इतिहास पाहिल्यानंतर समजेली की ते एक धर्मनिरपेक्ष राजा होते. त्यांनी अफगाणिस्तानापासून बर्मापासून भारतवर्ष बनवले…

इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत जिथे हिंदु-मुस्लिम शासकांनी सत्ता चालवण्यासाी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र, आज त्यांना राजकीय फायद्यासाठी धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे. त्यामागे गोदी मीडियाचा मोठा हात आहे” असं ट्विट आझमी यांनी केलं आहे.

LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच

दरम्यान, राज्यात आधी संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला. हा प्रकार ताजा असतानाच अहमदनगरच्या संगमनेरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात दोन गटांत तुफान दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर आता कोल्हापुरात औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने काढण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. या मोर्चात दगडफेक करण्यात आली आहे.

एकीकडे राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच अबू आझमी यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. आता औरंगजेबाच्या समर्थनात अबू आझमी यांच्या ट्विटनंतर राजकीय नेते काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, असा संतप्त सवाल केला आहे. तसेच महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घटना या कनेक्शनची चौकशी करणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us