Download App

Bacchu Kadu यांना मंत्रिपदाचा दर्जा; CM शिंदेंच्या आदेशानंतर शासन निर्णय जारी

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले. (MLA Bacchu Kadu Appoint as Chairman of Disability Welfare Department)

काय म्हटलं आहे निर्णयात?

राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबिण्यात येणार आहे. हे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.  शासनाने यासंबधीचे एक परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे.

बच्चू कडूंचा 20 वर्षांपासून दिव्यांगासाठी संघर्ष :

बच्चू कडू हे राज्यातील वृद्ध आणि दिव्यांगासाठी संघर्ष करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मागील २० वर्षांपासून ते दिव्यांग बांधवांच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. राज्यात दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करण्यासाठीही त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. अखेर डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाच्या स्थापनेची घोषणा केली.

बच्चू कडू काय म्हणाले?

दरम्यान, या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आमदार बच्चू कडू म्हणाले,  मोठ्या संघर्षानंतर देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय सुरू झाले. पण, ते दिव्यांग बांधवापर्यंत गेलं पाहिजे त्यासाठी या अभियानाची संकल्पना आमचीच होती. राज्यातील प्रत्येक विभागातील दिव्यांग बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आता हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत. फक्त सेवेसाठी हे अभियान असणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

Tags

follow us