Download App

जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटा अन् धर्मयोद्धा पुरस्कार घ्या; कोणी केली घोषणा?

  • Written By: Last Updated:

Hindu Mahasabha : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम (shriram) यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते, असं वक्तव्य आव्हाड यांनी काल शिर्डीतील शिबिरात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. संत महात्म्यांनाही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हा यांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे हिंदू महासभेतर्फे (Hindu Mahasabha) जाहीर करण्यात आले आहे.

कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यामुळं राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपासह अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून ठिकठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलन पुकारण्यात आले. आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे हिंदू महासभेने जाहीर केलं. हिंदू महासभेचे क्षेत्रीय संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी ही घोषणा केली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्यजित तांबे सरसावले; शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी 

आव्हाय यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया देतांना हिंदू महासभेचे प्रादेशिक संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शरद पवार साहेबांच्या कृपेने जगणारे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणजे ​​जीतूद्दीन हे काही लोकांना खुश करण्यासाठी, काही लोकांच्या दाढ्या कुरवळण्यासाठी वारंवार भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आणि देवी देवतांवर टीका करत असतात. प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी ते असं करत असतात. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीची अस्मिता आहेत. हा देश प्रभू रामचंद्र, बुद्ध, कृष्ण, महावीर, गुरु नानक या सर्वांचा आहे. या ठिकाणी मारूतीची उपासना केला जाते. ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगला, या काळात त्यांना कंदमुळं, फळ जेवत 14 वर्षे काढली. अशी देव स्वरुप प्रभू रामचंद्र यांच्यावर आव्हाड यांनी टिप्पणी केली. त्यांना लाज वाटली पाहिजे, सूर्यवंशी म्हणाले.

सूर्यवंशी पुढे म्हणाले, बारामतीच्या मटणाच्या तुकड्यावर जगणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला हिंदू महासभा पंढरपुरमध्ये सर्वोच्च धर्मयोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. भारतीय संस्कृतीवर आघात करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आम्ही हिंदू महासभेच्या वतीने देत आहोत, असे सूर्यवंशी म्हणाले.

जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असं आक्षेपार्ह विधान केल्यानंतर देशभरातून त्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आव्हाड यांच्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कारवाई करावी. सरकारने कारवाई केली नाही तर मी स्वत: त्यांना मारून टाकेन, त्यासाठी मला फाशी झाली तरी हरकत नाही, असं आचार्य महाराज

आव्हाड नेमकं काय म्हणाले?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाले आहात. पण आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहार खातो. 14 वर्षांपासून वनवासात असलेल्या व्यक्तीला शाकाहारी जेवण कोठून मिळणार?, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वादाला तोंड फोडलं आहे.

follow us