Rohit Pawar On Pilot Sumit Kapoor : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठे गौप्यस्फोट केले आहे. तसेच या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात होत का? असा सवाल देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताबाबत यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे. अतिशय संथ गतीने तसाप सुरु असल्याचा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. तसेच आम्ही ब्लॅक बॉक्सबाबत शंका व्यक्त केली होती. अपघानंतर पुन्हा स्फोट झाले त्याचे आता व्हिडिओ समोर आले आहेत. ब्लॅकबॉक्स जळला असं सांगत आहे पण ते केवळ मॅनिप्युलेशन सुरु आहे असा आमचा आरोप आहे असं देखील रोहित पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले.
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटला (Pilot Sumit Kapoor) कोणी ब्लॅकमेल केला होता का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती. त्यांना त्यातून ब्लॅकमेल करण्यात येत होतं का? त्यातून ही मुद्दाम घटना घडली का? अशी शंका आहे. सुमित कपूर यांना मद्य प्राशनाची सवय होती. त्यांची दोन वेळेस ब्रेथ अॅनेलेसिस चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना 3 ते 4 वर्षे निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते कोरोना काळात बेरोजगार होते. त्यानंतर त्यांना व्हीएसआर कंपनीत कमी पगारात नोकरी मिळाली होती. जेटमध्ये त्यांचा पगार 10- 12 लाख होता आणि संध्याच्या कंपनीत 3 ते 3.5 लाखात काम करत होते. त्यात त्यांना 25 हजार प्रत्येक फेरी मागे मिळायचे. त्यांना महागड्या मद्याची सवय होती. कौटुंबिक अडचणी यामुळे ते तणावात होते. त्यावरुन त्यांना कोणी ब्लॅकमेल केलाय का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.
व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही ?
या पत्रकार परिषदेत बोलताना व्हीएसआर (VSR) कंपनीवर कारवाई का? होत नाही असा प्रश्न देखील उपस्थितीत केला आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, अपघातग्रस्त व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही याचा शोध आम्ही घेतला आहे. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की, व्हिएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात आपल्या राज्याचे सत्ताधारी नेते गेले होते. या लग्नात कोण कोण गेले होते याचे फोटो देखील आमच्याकडे आहेत. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या मुलाच्या लग्नासाठी आंध्र प्रदेशच्या टीडीपी पक्षाचे प्रमुख नेतेही गेले होते.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ट्विट अन्…; रोहित पवाराचं मोठा गौप्यस्फोट
सत्तेतले बरेच नेते व्हिएसआर कंपनीतील मालकाशी निगडीत आहेत. ज्या कंपनीच्या माध्यमातून हा विमान अपघात झाला त्याचा मालक आज भारतात नाही. व्हिएसआर कंपनीला मुद्दामाहून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजितदादा गेले याचे दु:ख सत्तेतला माणसांना नाही परंतु व्हिएसआर मालकाला वाचवण्याची धडपड सुरु आहे असा दावा देखील या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
