MLC Election 2024 Mahayuti and Mahavikas Aghadi strength : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. शुक्रवारी या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरची मुदत होती. मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. आता विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महायुती-मविआ (Mahayuti and Mahavikas Aghadi) यांचं कुणाचं किती संख्याबळ? आहे हे जाणून घेऊ…
एकदा फटका बसला आता गाफीलपणा नको; महायुतीच्या मेळाव्यात शिंदेंचा युतीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र
कुणाचं किती संख्याबळ?
महायुती : 200
भाजप + 112
शिवसेना + 46
राष्ट्रवादी + 42
महाविकास आघाडी : 69
कॉंग्रेस 37
उबाठा + 15
राष्ट्रवादी (शरद पवार) + 12
इतर 5
तटस्थ : बविआ 3, एमआयएम – 2
महायुतीला फाटाफुटीचे टेन्शन :
त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही. शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
माझ्याबद्दल ब्र काढाल तर चप्पल बोलेल; Vidhan Parishad साठी हितेंद्र ठाकूरांनी सर्व पक्षांना ठणकावले
मविआचं संख्याबळाचं गणित :
काँग्रेसचे 37 मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त राहतील. आता ही 14 मते ठाकरे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसची ही मते मिळाली तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार मिलींद नार्वेकर निवडून येतील अशी परिस्थिती आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचाही अर्ज आहे. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे फक्त एकच मत आहे. शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. याशिवाय सपा आणि माकपाची तीन मते जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागणार आहेत.
हितेंद्र ठाकूरांनी सर्व पक्षांना ठणकावले…
या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे. यामध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. त्यात पालघरमधील बहुजन विकास आघाडीकडे तीन मतं आहेत. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपसह सर्वच पक्षांना आपल्यावर घोडेबाजाराचा आरोप केल्यास माझी चप्पल बोलेल असा थेट इशारा दिला आहे.