Download App

निवडणुकीतील मदतीसाठी भाजप नेत्यांना भेटणार : सत्यजीत तांबे

नाशिक : विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अखेरपर्यंत कमालीची गुप्तता बाळगल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्यानं सत्यजित तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी म्हणाले की, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. महाविकास आघाडीनं ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडली होती. त्यामुळं उमेदवार कोणता असावा हे काँग्रेसनं ठरवायचं होतं असंही त्यांनी म्हटलंय.

तांबे म्हणाले की, आपण ही निवडणूक उत्तर महाराष्ट्राच्या पदवीधरांच्या प्रश्नांसाठी, शिक्षकांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांची मला उमेदवारी देण्याची मागणी होती, पण काही तांत्रिक कारणास्तव माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यानं माझा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. आपण महाविकास आघाडीचा उमेदवार असलो तरी इतर पक्षाच्या नेत्यांना देखील आपण भेटणार असल्याचं सांगितलंय. आपण मनसे, भाजपसह इतर सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून आपल्याला मदत करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील भेट घेणार असल्याचं सांगितलं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आपल्याला मदत करतील अशीही सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

Tags

follow us