Raj Thackeray On MPSC Student Attack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काल ( 27 जून ) प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच एमपीएससी परिक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेली दर्शन पवार हीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भरदिवसा पुण्यात ही घटना घडली आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले की, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं”.
Nashik : शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का! ठाकरेंच्या गोटात उत्साहाचं वातावरण
ते पुढे म्हणाले की, ” दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा”.
काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 28, 2023
पंकजा मुंडेंचं भविष्य रामदास आठवलेंनी सांगितलं; BRS प्रवेशाच्या चर्चांवर म्हणाले…
दरम्यान, भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये आज ( 27 जून ) रोजी ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. भर रस्त्यावरच हा भयावय प्रकार सुरू असताना या तरूणीच्या मदतीला सुरूवातीला कोणीही आलं नाही. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाल रोखलं आणि सुदैवाने तिचे प्राण बचावले.