थकबाकीवरून मीटर काढायला आल्यास चोर समजून प्रसाद देणार…, मनसेचा महावितरणला इशारा

MNS On Mahavitaran : शहरात वीज बिलाच्या थकबाकीवरून वीज मीटर काढून नेण्याच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने

MNS On Mahavitaran

MNS On Mahavitaran

MNS On Mahavitaran : शहरात वीज बिलाच्या थकबाकीवरून वीज मीटर काढून नेण्याच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ संभाजी बाबर यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत निवेदन देत ही कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले की, नागरिकांकडून वीज बिल भरण्यास थोडा विलंब झाला किंवा अगदी किरकोळ थकबाकी (उदा. 350 रुपये) असली तरी महावितरणकडून तत्काळ वीज मीटर काढून नेले जात आहे. ही पद्धत अन्यायकारक असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मीटर काढून नेल्यानंतर पुन्हा वीज जोडणी मिळविण्यासाठी ग्राहकांना विविध कार्यालयांचे चकरा माराव्या लागत आहेत. यामध्ये वेळेचा अपव्यय होण्यासोबतच विविध शुल्कांच्या स्वरूपात आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे बाबर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ही बाब नागरिकांच्या शोषणासारखी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मनसेने महावितरण प्रशासनाला इशारा देत, अल्प थकबाकीवरून वीज मीटर काढण्याची कारवाई तात्काळ थांबवावी आणि नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा मीटर काढायला आलेल्या कर्मचाऱ्याला चोर समजून व्यवस्थित सत्कार करण्यात येईल, असा मनसे (MNS) स्टाईलने इशारा दिला आहे.

Renault Duster अखेर भारतात लाँच: किंमत, फीचर्स अन् इंजिनची कामगिरी जाणून घ्या

दरम्यान, या निवेदनामुळे शहरात वीज पुरवठा व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून महावितरणकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version