Download App

जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही, अनिल बोडेंनी डिवचलं

मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये

  • Written By: Last Updated:

Anil Bonde On Maratha Reservation : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांनी केली. अशातच भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मोठं विधान केलं. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये, असं बोंडे म्हटलं. ते रविवारी अमरावती येथे माध्यमांशी बोलत होते.

Bigg Boss Marathi मध्ये ‘खिलाडी कुमार’ लावणार हजेरी, भाऊचा धक्का होणार एकदम झापुक झुपुक 

रविवारी अमरावतीत भाजप ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनिल बोंडे यांनी मनोज जरंगे पाटील यांना डिवचणारे वक्तव्य केलं. रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला जाईल. मात्र सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, असं बोंडे म्हणाले.

चीनची अंतराळातही डोकेदुखी! रॉकेटच्या कचऱ्याने सॅटेलाइट्स अन् स्पेस स्टेशन धोक्यात.. 

समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचं होईल, असंही ते म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही जरांगेंची मागणी आहे. यासाठी त्यांनी सरकारला अनेकदा अल्टिमेटम दिला आहे, पण सरकारकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणूक लढवण्याचे त्यांनी संकेत दिले. त्यानंतर जरांगे यांच्या शांतता रॅलीत ‘भावी मुख्यमंत्री’चे पोस्टर झळकल्याचं दिसून आलं. ‘मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्यचां दिसलं.

दरम्यान, जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अशी टीका करत बोडेंनी जरांगेंना डिवचलं. त्यावर आता जरांगे काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us