Download App

शेतकऱ्यांसाठी खासदार लंके ॲक्शन मोडमध्ये, कांद्यांच्या माळा गळ्यात घालत संसदेत घेतली एन्ट्री

Nilesh Lanke On Onion Price : जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर कांद्याला कमी भाव मिळत

  • Written By: Last Updated:

Nilesh Lanke On Onion Price : जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर कांद्याला कमी भाव मिळत असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांची परिस्थिती अधेरिखित करण्यासाठी अहिल्यानगरचे (Ahilyanagar) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कांद्याचा हार घालून संसदेत (Parliament) प्रवेश केला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कांदा (Onion Price) आहे मात्र त्याचे दर घसरत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. असं माध्यमांशी बोलताना खासदार लंके म्हणाले. तर कांद्याचे दर वाढवावेत आणि शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात यावा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी केली.

माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते मात्र कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कांद्याला 10 ते 12 रुपये सुद्धा बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना कांद्याला उत्पादन खर्च 14 ते 15 रुपये येत असतो. मात्र आज उत्पादन खर्चाच्या भावात देखील कांदा विकला जात नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. असं माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले.

तसेच कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. कांद्याला 40 ते 45 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी खासदार लंके यांनी केली. तसेच दुधाचे आणि इतर मालाचे हमीभाव वाढले पाहिजे कारण शेतकरी जगाचा अन्नदाता आहे मात्र त्याला योग्य भाव मिळत नसल्याने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. असेही यावेळी खासदार लंके म्हणाले. याच बरोबर शेतकऱ्याला योग्य बाजाराभाव मिळाला पाहिजे ही आमची सर्वात मोठी मागणी असून आम्ही यासाठी आंदोलन करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया देखील माध्यामांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले.

तर दुसरीकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केंद्राने किंमत स्थिरता राखण्यासाठी सप्टेंबरपासून त्यांच्या कांद्याच्या बफर स्टॉकचे कॅलिब्रेटेड रिलीज सुरू करण्याची घोषणा केली आहे. माहितीनुसार या वर्षी सरकारने किंमत स्थिरीकरण बफर अंतर्गत 3 लाख टन कांदा खरेदी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की मागील वर्षांपेक्षा वेगळे, 2024-25 मध्ये उत्पादन पातळी जास्त असल्याने चालू पावसाळ्यात आवश्यक भाज्यांच्या किमती – विशेषतः बटाटे, कांदे आणि टोमॅटो – नियंत्रणात राहिल्या आहेत.

तृतीयपंथीयांचा आधारस्तंभ हरपला! काजल गुरु यांचे निधन, हक्कांसाठी झटणारा आवाज थांबला

चालू कॅलेंडर वर्षात अन्नपदार्थांच्या किमती बऱ्याच प्रमाणात स्थिर आणि नियंत्रित राहिल्या आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ग्राहक व्यवहार विभागाने निरीक्षण केलेल्या बहुतेक वस्तू वर्षानुवर्षे स्थिरता दर्शवत आहेत किंवा घसरणीचा कल दर्शवत आहेत. जुलै 2025 मध्ये घरगुती थाळीच्या किमतीत 14% घट अन्न महागाईत सातत्याने घट दर्शवते.

follow us