Download App

सुप्रिया सुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढणार?

तपास यंत्रणांवर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा आरोपीला खून झालेला आहे. सर्व आरोपी हे

  • Written By: Last Updated:

Supriya Sule Visit Massajog Village : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज (18 फेब्रुवारी)रोजी मस्साजोगमध्ये जाणार आहेत. (Supriya Sule) त्यासोबतच परळीतील महादेव मुंडे यांचा खून 14 ते 15 महिन्यापूर्वी झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची देखील सुळे भेट घेणार आहेत.

एकही आरोपी सुटला तर आम्ही टोकाचे पाऊल उचलणा, मुंडे-धस भेटीनंतर धनंजय देशमुखांचा इशारा

सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडही मस्साजोग दौऱ्यावर जाणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुरवातीपासूनच संतोष देशमुख खात्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष भेटीनंतर जितेंद्र आव्हाड नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर, दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव आणखी वाढल्याचं बोललं जात आहे.

तुम्ही मला पोरक करू नका

तपास यंत्रणांवर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा आरोपीला खून झालेला आहे. सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. हत्या झाल्यापासून आठ दिवसात काय काय प्रकार घडले याची सविस्तर माहिती मागवणार आहोत. गावातील दहा व्यक्तींची कमिटी तयार करून या तपासावर लक्ष ठेवू..आपल्यामध्ये समन्वय राहील असं करू, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

आपला माणूस गेला आहे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे..सुप्रिया सुळे यांना भेटीदरम्यान कोणत्या मागण्या द्यायच्या या संदर्भातील निवेदन तयार करू..आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी न्याय मिळावा ही भावना आहे, त्याची जाणीव आहे. तुम्ही मला पोरक करू नका, असं धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना आवाहन केलं. आपण सर्व गरीब माणसे आहोत..तुम्ही असा कधी संकोच बाळगू नका मला बोलण्यासंदर्भात, असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

follow us