MPSC : औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटला? गुन्हा दाखल होणार…MPSC ने स्पष्ट सांगितलं

औषध निरीक्षक भरतीत पेपर लिक प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

MPSC

MPSC

MPSC Drugs Inspector Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक (MPSC Drugs Inspector) पदासाठी घेतलेल्या परिक्षेच्या पेपर फुटल्याच्या आरोपानंतर अखेर एमपीएससीकडून दखल घेण्यात आली आहे. औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटीच्या आरोपानंतर पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचं एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता खरंच पेपर फुटला होता, याला दुजोरा मिळत असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औषध निरीक्षक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत भरती प्रक्रियेचा संपूर्ण कठ्ठाचिट्टाच सांगितला आहे. आमदार रोहित पवार यांनी एका कथित क्लासेसचा उल्लेख करीत जसा नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर लिक केला अगदी तसाच आयोगातील ज्याने पेपर सेट केला त्यानेच फोडला असल्याचा गंभीर करण्यात आला आहे. अशातच एमपीएससीला एका तक्रारदाराने इमेल करुन पेपर लिकची तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा सुधारित मेल करुन संभ्रम पसरवण्यासाठीच हा मेल केला असल्याचा दावा करण्यात आला.

परीक्षा, स्पर्धा आणि नैराश्याचा विळखा; 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढलेल्या विद्यार्थी आत्महत्यांनी वाढवली चिंता

या संपूर्ण प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणातील सत्यता समोर आणण्यासाठी डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी आयोग गुन्हा दाखल करणार असल्याचं पत्रकच आयोगाने प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुरावे मागितल्यानंतर डिजिटल पुरावे सादर करण्यात आले. या पुराव्यांनुसार 27 जुलैला तक्रारदार आणि ज्या उमेदवाराला लाभ मिळाल्याचा आरोप होता, त्या दोघांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलावलं, परंतू दोघेही गैरहजर राहिले असल्याचंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या देशात नीट पेपर लिक प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असतानाच आता पुन्हा एमपीएससी औषध निरीक्षक पेपर लिक प्रकरण उघड होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून आणखीनच संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार रोहित पवार यांचा आरोप काय?
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पवार यांनी सरकारच्या काळ्या अध्यायाची मालिकाच सांगितली आहे. मागील अनेक वर्षांत झालेल्या भरतीमध्ये पेपरफुटी झाला असल्याचाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. 27 जून 2026 ला टीईटी पेपर फुटला होता, त्यानंतर 1 मे 2026 रोजी नीटचा पेपर लिक झाला होता. मे 2026 मध्ये एसआरपीएफचा पेपर लिक झाला होता. 2024 ला जलसंधारणचा फुटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचा 2023 साली फुटला होता. एवढंच नाही तर कोतवाल भरतीचाही पेपर लिक झाला होता, सिस्टिममध्ये आपल्या विचारांचे लोकं घालण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप आमदार पवार यांनी यावेळी केला आहे.

Exit mobile version