Download App

MPSC चा मोठा निर्णय, पहिल्यांदाच मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार

MPSC Exam Online : एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती सार्वत्रिक झाली आहे असून एमपीएससीने याबाबत खुलासा केला असून केवळ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे. त्याचे आधार कार्ड व इतर माहिती लिक झालेली नाही. तसेच प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीकडून देण्यात आलंय.

कुठलाही डेटा लीक होत असेल तर, MPSC प्रकरणावर आमदार रोहित पवार म्हणाले…

या दरम्यान आता एमपीएससीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीची मुख्य परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने होण्याऱ्या परीक्षेस विद्यार्थी विरोध करत आहेत. दरम्यान यासाठी विद्यार्थी आंदोलन करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात यावं यासाठी ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जातोय अशीही चर्चा सुरू आहे.

यामध्ये लोकसेवा आयोगाच्या परिक्षेशी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य निगडीत असल्याने येत्या 30 एप्रिलला होणारी ही परिक्षी तत्काळ रद्द करुन दुसऱ्या प्रश्नपत्रिका आयोगाकडून काढण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us