एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डेटा लीक होत असेल तर त्याची शासनाने तत्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, येत्या 30 तारखेला होणाऱ्या एमपीएससीच्या अराजपत्रित संयुक्त परीक्षेचे हॉल तिकीट लीक झाल्याचं समोर आलं आहे. त्यावरुन आमदार रोहित पवारांनी ट्टिटद्वारे सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
परीक्षेच्या ऐन तोंडावर अशी घटना घडल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचं आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. अशा प्रकारे कोणत्याही वेबसाईटवरून कुठलाही डेटा लीक होत असेल तर याची शासनाने त्वरित दखल घेऊन याप्रकरणी खुलासा करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 23, 2023
आमदार रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले, “परीक्षेच्या ऐन तोंडावर अशी घटना घडल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचं आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. अशा प्रकारे कोणत्याही वेबसाईटवरून कुठलाही डेटा लीक होत असेल तर याची शासनाने त्वरित दखल घेऊन याप्रकरणी खुलासा करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी”, अशी मागणी आमदार पवारांनी ट्टिटरद्वारे केलीय.
एका telegram चॅनलवर #MPSC च्या ९४००० उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाले असून येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही त्यांच्याकडे असल्याचा दावा केला गेलाय. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis pic.twitter.com/iQEN14GgsU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 23, 2023
दरम्यान, येत्या 30 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ब आणि क संयुक्त परिक्षा पार पडणार आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरच प्रसिद्ध होत असतं. विद्यार्थी आयोगाच्या वेबसाईटवरुनच हॉल तिकीट डाऊनलोड करीत असतात. मात्र, या परीक्षेचे हॉल तिकीट वेबसाईटवर नाहीतर एका अज्ञात व्यक्तीकडून टेलिग्रामवर व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलंय.
एवढंच नाहीतर या व्यक्तीने आपल्याकडे विद्यार्थ्यांची इतर माहिती आणि प्रश्नपत्रिकासुद्धा असल्याचा दावा केलायं. या व्यक्तीकडे जवळपास 90 हजार विद्यार्थ्यांची माहिती आणि हॉल तिकीट असल्याचं समोर आलंय. यावरुन आता राज्यात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरल्याचं दिसतंय.
अतिकने ताब्यात घेतलेली संपत्ती पीडितांना परत मिळणार; योगी सरकारचा मोठा निर्णय
आमदार सत्यजित तांबे यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्यांची माहिती लीक होणं ही अतिशय गंभीर बाब असल्याचं म्हटलंय. तसेच संबंधितांवर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणीही केलीय. त्यानंतर आमदार रोहित पवारांनीही सत्ताधारी सरकारने याबद्दल खुलासा देऊन तत्काळ दोषींवर कारवाईची मागणी केलीय.
या संपूर्ण प्रकरणावर महारष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुलासा करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आणि इतर माहिती लिक झालेली नसून प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीकडून देण्यात आलंय.
दरम्यान, आपल्या उज्वल भविष्यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असतात. अशावेळी लोकसेवा आयोगाकडे असलेली माहिती संबंधित व्यक्तीकडे जातेच कशी? असा सवाल राज्यभरातील विद्यार्थ्यांना पडला आहे.