Download App

महावितरणच्या संपावर प्रताप हेगडेंनी मांडली भूमिका…

मुंबई : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना महावितरण कंपनी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. कंपनी आमची आहे, सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे. त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमच्या आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांनी दिली.

प्रताप हेगडे म्हणाले, केवळ संपाने हा प्रश्न सुटणार नाही खरं म्हणजे उत्तर महावितरण कंपनीकडे आणि कर्मचाऱ्यांच्याकडेच आहे. ग्राहक या संपाला का प्रतिसाद देत नाही पाठिंबा देत नाहीत? याचा विचार केला पाहिजे.

महावितरणचे कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहे. असे असले तरी ग्राहकांची वीज सुरळीत सुरू राहणार आहे. सगळीकडे वीज बंद पडेलच अशी काय अवस्था नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महावितरण कंपनीने जर ग्राहकांच्या हितासाठी देखील काम केले तर ग्राहक देखील या कंपनीला सहकार्य करेल देशात सर्वात जास्त महावितरण कंपनीचे आहे आणि त्यांची पुन्हा मागणी आहे की दर वाढले पाहिजेत. महावितरण कंपनी ही मोठी कंपनी आहे जर ग्राहकांच्या हित साधून कंपनीने काम केले तर कितीही खाजगी कंपनी स्पर्धेत आल्या तरी महावितरण कंपनीची बरोबरी करू शकणार नाही, असे हेगडे यांनी म्हटले.

Tags

follow us