Download App

औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण द्या, कथित मुघल वशंजाचं संयुक्त राष्ट्राला पत्र

औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण द्या, अशी मागणी मुघलांचे कथित वंशज याकुब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्राकडे केलीयं.

Yakub Habeebuddin Tucy : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन चांगलच रान पेटल्याचं दिसून आलं. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी काही संघटनांकडून करण्यात आल्यानंतर राज्यात वादंग पेटलं. या मुद्द्यावरुन नागपुरात दंगलही उसळली होती. आता कथित मुघल वंशजाकडून औरंगजेबाच्या कबरीबद्दल संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅंटोनियो गुट्रेस यांना पत्र धाडण्यात आलंय. औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी शेवटचा मुघल बादशाह बहादुर शाह जफर यांचा वंशच असल्याचा दावा करणाऱ्या याकुब हबीबुद्दीन तुसी (Yakub Habeebuddin Tucy) यांनी केलायं.

पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार, ‘या’ दिवशी सन्मानित करण्यात येणार

काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात हिंसाचार घडला. तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली कबर उखडून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी योग्य नियोजन करा; नगरमध्ये शासकीय यंत्रणांची महत्वाची बैठक

याकुब हबीबुद्दीन तुसी यांनी पत्रात म्हटलं, औरंगजेबाची कबर असलेली जागा ही वक्फची मालमत्ता असून कबरीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा 1958 कायद्यानूसार संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. कायद्याच्या तरतुदींनूसार स्मारकाजवळ कोणतेही अनधिकृत बांधकाम, बदल किंवा उत्खनन करता येणार नाही. अशी कृती केल्यास ती बेकायदेशीर दंडनीय मानली जाईल, असं याकुब तुसी यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, चित्रपट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐतिहासिक प्रसंगांचे चुकीचे वर्णन केलं असून लोकांच्या भावनांमध्ये हात घातला जात आहे. ज्यामुळे समाजात द्वेष पसरवला जात असून पुतळे जाळण्यासारखे प्रतिकात्मक आंदोलने केली जात असल्याचं तुसी यांनी पत्रात स्पष्ट केलंय.

follow us