Download App

आनंदाची बातमी! शिंदे सरकार ‘या’ कुटुंबांना देणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर

Mukhyamantri Annapurna Yojana : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद

  • Written By: Last Updated:

Mukhyamantri Annapurna Yojana : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात सरकारने महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहे.

महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासह मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा देखील केली आहे. सरकार मुख्यमंत्री अन्नपुर्णा या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. याचा तब्बल 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. मात्र या योजनेसाठी काही नियम देखील लागू करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकारच्या या योजनेमुळे अनेक महिलांचे टेन्शन संपणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपुर्णा या योजनेंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

तसेच राज्य सरकारकडून महिलांसाठी पिंक ई रिक्षा या योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर लेक लाडकी या योजनेची देखील सुरुवात झाली असून या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात महिलांसाठी काय काय

“शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका

जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर

लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट

महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन

‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती

मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती.

अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार

या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5 हजार 499 मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज