हायकोर्टाचा शिंदे-फडणवीसांना धक्का, आमदार निधी वाटपाला स्थगिती

मुंबई : मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे […]

Mumbai High Court

Mumbai High Court

मुंबई : मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे.

राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. तर ही स्थगिती नव्या अर्थिक वर्षातील आमदार निधीच्या वाटपाला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच गेल्या वर्षी केलेल्या आमदार निधी वाटपावर स्पष्टीकरणामध्ये कोणाला किती निधी दिला ? याचे तपशील कोर्टाने मागवले आहेत.

रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप

शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधीच्या वाटप करताना पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केला होता. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी देखील असाच निधी वाटपाबाबत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप केला होता.

Exit mobile version