BMC Election : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार असून मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena UBT) युती होणार असल्यचाी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. जर मनसे आणि ठाकरे गटात युती झाली तर याचा मोठा फटका महायुतीला बसणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.
‘नो रिस्क’ धोरण
राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार जर ठाकरे बंधू एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची ताकद वाढेल यामुळे प्लॅन बी अंतर्गत महायुती प्रमुख महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील इतर काही प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्र लढवण्याची तयारी करत आहे.
मुंबई जिंकण्यासाठी प्लॅन
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये (BMC Election) ठाकरे बंधूंना फायदा होऊ नये यासाठी महायुती मुंबईत देखील एकत्र लढण्याचा प्रयत्न करत आहे. माहितीनुसार, मुंबईसाठी महायुती विशेष प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू देखील यासाठीच एकत्र येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मुंबई जिंकण्याची जबाबदारी शहराचे राजकारण चांगले समजाऱ्या नेत्यांवर सोपवली जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीच्या आमदारांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील महायुतीमधून समोर येत आहे. याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची पोलखोल देखील महायुतीकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Video : उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून पूर; 4 जणांचा मृत्यू
जनसंपर्क वाढवण्याची तयारी
मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जनसंपर्क वाढवण्याची तयारी देखील महायुतीकडून करण्यात येत आहे. माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान मोफत ट्रेन आणि एसटी बस सेवांची व्यवस्था महायुतीकडून करण्यात येणार आहे.