Download App

अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी सावत्र वडील परवेझ टाक दोषी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

परवेझ टाकला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालय 14 मे रोजी त्याच्या शिक्षेच्या प्रमाणावरील युक्तिवाद ऐकणार आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने 2011 च्या अभिनेत्री लैला खान (Actress Laila Khan) आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी सावत्र वडील परवेझ टाकला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने परवेझ टाक, लैला खानचे वडील, खान, तिची आई आणि भावंडांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये हे हत्याकांड झाले होते. त्यानंर परवेझ टाकला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालय 14 मे रोजी शिक्षा सुनावणार आहे. टाकला भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत इतर गुन्ह्यांसह खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. (Mumbai Sessions Court Convicts Parvez Tak In Actress Laila Khan & Her Family Members’s Murder Case )

टाक हा लैलाची आई सेलिना यांचा तिसरा पती होतो. लैला, आई सेलिना आणि तिच्या चार भावंडांची इगतपुरीतील त्यांच्या बंगल्यात परवेझने फेब्रुवारी 2011 मध्ये हत्या केली होती. टाकचा सेलिनासोबत तिच्या मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बंगल्यात अभिनेत्री, तिची आई आणि तिच्या चार भावंडांची हत्या करण्यात आली होती. काही महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांनी टाकला अटक केली होती.

मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष

वादानंतर घडले अंगावर काटा आणणारे हत्याकांड

लैलाची आणि सेलिया यांच्यासोबत टाकचा मालमत्तेवरून वाद झाला. त्यानंतर टाकने आधी सेलिनाचा खून केला. त्यानंतर लैला आणि तिच्या चार भावंडांचीही हत्या केली. टाकला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केल्यावर हे हत्याकांड उघडकीस आला. त्याचवेळी बंगल्यातून लैलाचे तिची आई आणि भावंडांसह मृतदेह सापडले होते.

Bhaiyya Ji Trailer: मनोज वाजपेयीचा जबरदस्त ॲक्शन अवतार, ‘भैय्या जी’चा ट्रेलर पाहिलात का?

मेकअपमधून चित्रपट क्षेत्रात एन्ट्री

रेश्मा पटेल म्हणजेच लैला खानचा जन्म 1978 मध्ये झाला होता आणि तिने 2002 मध्ये कन्नड चित्रपट ‘मेकअप’मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर ती राजेश खन्नांसोबत 2008 मध्ये आलेल्या ‘वफा ए डेडली लव्ह स्टोरी’ या थ्रिलर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली आणि 2011 मध्ये तिची हत्या करण्यात आली.

follow us

वेब स्टोरीज