Nagarparishad Election Result : भाजपचं ‘कमळ’ फुललं; 122 नगरपरिषदांवर वर्चस्व, विरोधकांच्या पदरी निराशाच…

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून राज्यात सर्वत्र भाजपचाच बोलबाला असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Nagar Parishad Election

Nagar Parishad Election

Nagarparishad Eletion Results BJP : बहुचर्चित असलेल्या राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगपंचायतींच्या (Nagarparishad Eletion Results BJP) निवडणुकीचा निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असल्याचं दिसून येत आहे. 288 नगरपरिषदांपैकी 122 नगराध्यक्षपदाची सुत्रे ही भाजपच्या हाती आली असून 53 शिंदेसेना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 39 जागांवर आघाडी मिळाल्याचे निकाल समोर आलेले आहेत. तर विरोधकांच्या पारड्यात अवघे 49 जागा मिळाल्या आहेत.

राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू; विभागानुसार मुख्य लढती कोणत्या?

मराठवाड्यात भाजपचं ‘कमळ’ फुललं…
मराठवाड्यात 52 पैकी 20 नगराध्यक्षपदांवर भाजपला विजय मिळाला आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 11 तर शिवसेनेले 8 नगराध्यक्षदे मिळालेली आहेत. मराठवाड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त भोकरदनचं नगराध्यक्षपद मिळालंय. तर मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेचा हिरमोड झाला असून अवघ्या 8 च जागांवर विजय मिळवता आलायं. तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेचं मराठवाड्यात पानिपत झालं असून फक्त फुलंब्रीत विजय मिळवता आला आहे.

विदर्भात भाजपला निम्मं यश…
विदर्भात 100 जागांपैकी भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं असून 50 जागांवर भाजपला यश मिळालंय. तर भाजपसोबत काँग्रेसलाही विदर्भात लक्षणीय यश मिळालं असून एकूण 25 जागांवर विजय मिळालायं.

मामा-भाच्याच्या जोडीने खताळांना पाणी पाजलं…
अहिल्यानगरच्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांना माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबेे यांनी पाणी पाजलंय. सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिती तांबे यांचा दणदणीत विजय झालायं. तर आमदार खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांचा पराभव झालायं. नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे 4 थ्या फेरीअखेर 17 हजार मतांनी आघाडीवर. होत्या त्यावेळीच संगमनेमध्ये आणि तांबे कुटुंबियांकडून विजय साजरा केला गेला. तर यावेळीच महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर असल्यामुळे विद्यमान शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच यातून तांबे थोरातांनी थोरातांच्या पराभवाचा वचपा काढला आहे.

Exit mobile version