Nahik Congress : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून या बंडावर टीका केली जात असताना आता नाशिक कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले एक पोस्टर चांगलंच चर्चेत आलं आहे. ( Nahik Congress Poster in NCP Political Crises)
‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!
काय आहे हे पोस्टर?
नाशिकमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. नाशिक जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड यांच्याकडून हे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावर कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे फोटो लावले आहेत. तर यावर म्हटले आहे. ‘जनतेसाठी एकमेव अश्वासक पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, कॉंग्रेस म्हणू… कॉंग्रेसच आणू…’
>MS Dhoni: माहीच्या आयुष्यावर नवा सिनेमा; कोण साकारणार धोनीचा रोल? चाहते उत्सुक
त्यामुळे या पोस्टरवरून कॉंग्रेसने एकप्रकारे राज्यातील आपली भूमिका स्पष्ट करत जनतेला आवाहन केले आहे. याद्वारे गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आणि यावर्षी झालेल्या अजित पवारांच्या बंडावर टीका करण्यात आली आहे. हे पक्ष आपल्या विचारसरणीवर ठाम राहिले नाहीत. जनतेने ज्या आधारावर त्यांना मतदान केलं. त्याला त्यांनी हरताळ फासले आहे. त्यामुळे आता जनतेसाठी कॉंग्रेस हाच एकमेव अश्वासक आणि आपल्या विचारसरणीवर ठाम आहे.
दरम्यान राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आल्याने कॉंग्रेस समोर पेच निर्माण झाला आहे. मात्र या वादावर अद्याप कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.