‘ 21 दिवस रोज पाच वेळा नमाज’, मारहाणी प्रकरणी Malegaon कोर्टाची तरुणाला शिक्षा

नाशिक :  नाशिक ( Nashik )  जिल्ह्यातील मालेगाव ( Malegaon ) येथील न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयाने सदर व्यक्तीला रोज 21 दिवस 5 वेळा नमाज अदा करण्याचे व दोन झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तेजवंत सिंह संधू यांनी हा निर्णय दिला आहे. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा आदेश […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T164323.894

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 01T164323.894

नाशिक :  नाशिक ( Nashik )  जिल्ह्यातील मालेगाव ( Malegaon ) येथील न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयाने सदर व्यक्तीला रोज 21 दिवस 5 वेळा नमाज अदा करण्याचे व दोन झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तेजवंत सिंह संधू यांनी हा निर्णय दिला आहे.

27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टच्या नियामानुसार मॅजिस्ट्रेट यांना अधिकार असतो की, ते कोणत्याही दोषी व्यक्तीला योग्य सल्ला किंवा चेतावणी देऊन सोडू शकतात. यामुळे संबंधित आरोपी असला गुन्हा परत करणार नाही. कोर्टाने असे म्हटले आहे की, आरोपीने ही शिक्षा लक्षात ठेवून पुन्हा असा गुन्हा करण्याची चूक करु नये. या केसमध्ये आरोपीला फक्त चेतावणी पुरेशी असेल असे न्यायालयाने म्हटले आहे.

(शिवसेना हादरली ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उपविभाग प्रमुखाची हत्या)

न्यायालयाने 30 वर्षीय आरोपी रऊफ खान याच्यावर 2010 साली झालेल्या एक केसमधील सुनावणीवर हा निर्णय दिला आहे. त्याच्यावर रस्त्यावर अपघात करणे व अपघातानंतर समोरच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने या खटल्यात आरोपी रऊफला दोषी ठरवले आहे. सुनावणीच्या वेळी रऊफने सांगितले होते की तो नियमित नमाज अदा करत नाही आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला सलग 21 दिवस पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर सोनापुरा मस्जिदीच्या परिसरात दोन झाडे लावावी व त्यांची काळजी घ्यावी, अशी शिक्षा त्याला देण्यात आली आहे.

दरम्यान रऊफ खान याच्यावर भारतीय दंड संहिता 323 ( स्वेच्छेने जखमी करणे ),  325 ( स्वेच्छेने गंभीर जखमी करणे ), 504 ( शांतता भंग करण्यासाठी जाणूनबुजून अपमान करणे )  व 506 ( गुन्ह्याची धमकी देणे ) या कलमांच्या अंतर्गत केस दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपी रऊफला कलम 323 नुसार दोषी ठरवले असून त्याला इतर आरोपातून मुक्त केले आहे.

Exit mobile version