साठीनंतर असे कृत्य अयोग्य, भगवानबाबांची परिस्थिती वेगळी होती, आदिनाथ महाराजांना नामदेव शास्त्रींचा सल्ला

भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी एका साप्ताहतील कीर्तनात यावर भाष्य केले आहे. त्यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

Untitled Design 102

Untitled Design 102

Namdev Shastri’s advice to Adinath Maharaj : पाथर्डी-बीड हद्दीवरील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दोन आठवड्यांपूर्वी आपल्या स्वतः वर वार करून घेतले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावर बोलताना आदिनाथ शास्त्री म्हणाले आहेत, “जनन इंद्रियाचा जो त्याग झाला तो मी स्वतः होऊन केला आहे. कोणाचा काहीच त्रास नाही. ”

याचा संदर्भ देऊन भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी एका साप्ताहतील कीर्तनात यावर भाष्य केले आहे. त्यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. डॉ. ​नामदेव शास्त्री म्हणाले, “आदिनाथ महाराजांनी भगवान बाबांसारखा शरीराला छेद करून घेतला. ते चूक आहे. माणसाने ज्ञानी असावे. आपणावर आघात करून घेऊ नये. भगवानबाबांची परिस्थिती वेगळी होती. भगवानबाबांनी 20-22 वर्षांच्या काळात आपल्या शरीराला छेद घेतला होता.

महसूल विभागात खळबळ! 13 अतिगंभीर प्रकरणांत दोषी अधिकाऱ्यांना सक्तीची रजा

तुम्ही वयाची साठी गाठत आला आहात. साठीला हे करणे चुकीचे. ​उद्या कोणतेही येणारे साधक आपल्या शरीराचे अंग कापतील व संत होतील. ही चुकीची परंपरा तुम्ही सुरू केली. मी हे सौजन्याने बोलतो आहे. समाजाची सहानुभूती तुम्हाला मिळत आहे. पण अशा रीतीने समाजाची सहानुभूती घेणे हे पाप आहे. संतांचे प्रेम मिळाले पाहिजे. सहानुभूती नव्हे. तुमच्यावर काहीही आरोप नसताना हे कुटाणे कशाला केले? त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो नाही. असा आदर्श लोकांसमोर ठेवू नका. नाहीतर पुढचा महंत तसाच बसवावा लागेल.

​सहानुभूती कोठे आहे जेथे सत्य आहे. आपल्या शरीराला सांभाळा. ती तारकेश्वराची गादी आहे. तारकेश्वर मालक आहेत. आपण वॉचमन आहोत. त्यांच्या नावाने आपण जगतो. सेवा करायला आपणास मिळाली हे भाग्य. वॉचमन या नात्याने नारायण महाराज यांची सेवा करा. संत होण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानाने संत ओळखला जातो. ज्ञानेश्वरीने मोठे व्हा. शरीर कापून मोठे होऊ नका. माझे बोलणे वाईट वाटणार आहे. पण सत्य सांगितले पाहिजे. चुकीचा आदर्श समाजासमोर मांडायला नको.”

Exit mobile version