Download App

बाळासाहेब थोरातांचे ना पत्र, ना राजीनामा; Nana Patole यांनी केला खळबळजनक दावा..

मुंबई – राज्यात नाशिक पदवीधर निवडणूक पदवीधर निवडणूक चांगलीच गाजली.या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. निवडणूक निकालानंतर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasahed Thorat) यांनी दिलेला राजीनामा तसेच थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद प्रकर्षाने दिसून आला. या मुद्द्यावर नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. बाळासाहेब थोरात आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत. हे सर्व चित्र भाजपनेच (BJP) उभे केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी ना कोणते पत्र पाठवले, ना राजीनामा दिला, असा दावा पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले, की ‘माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा विश्वासघात केला आहे. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांनी त्याचवेळी जर सत्यजितसाठी तिकीट मागितले असते तरीही पक्षाने दिले असते. त्यात कोणताही वाद होण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. निवडणुकीच्या वेळी तांबे कुटुंब अर्ज भरायले गेले. तसे भाजपचेही अर्ज भरायला गेले होते.मात्र डॉ. तांबे यांनी अर्ज भरला नाही. तर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यानंतर भाजपने तर अर्जच भरला नाही. यावरून हे स्पष्ट होते की ही ठरवलेली स्क्रिप्ट होती. त्यामुळे आता या मुद्द्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही,’ असे पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले, की ‘थोरात यांनी जर काही पत्र दिले असेल तर ते पत्र मला दाखवा. मिडीया परफेक्शन करणे हा भाजपचा नेहमीचाच प्लान असतो. थोरात यांनी कोणतेही पत्र दिले नाही किंवा राजीनामाही दिलेला नाही. राजीनामा दिल्याचे सांगितले जात असले तरी त्या हवेतल्या गोष्टी आहेत. राजीनामा दिला असेल तर मला दाखवा,’ असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. भाजपनेच हा सारा वाद पुढे आणल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. संजय राऊतांनी शक्तीचा मला अनुभव करून दिला. त्यांचे आभार मानतो. शिंदे म्हणतात दिल्लीची महाशक्ती आमच्या मागे आहे. तेव्हा ही महाशक्ती आणि खोक्यांचा एकटा सामना करू शकतो. याची जाणीव त्यांनी करून दिल्याचे पटोले म्हणाले.

हायकमांडच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. हायकमांडने राजीनामा द्यायला सांगितले होते. म्हणून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी एक वर्ष अध्यक्ष होऊ दिला नाही. संग्राम थोपटेंना अध्यक्ष करायचे होते. पण होऊ दिले नाही. पक्षनेतृत्वाने आदेश दिले तर नक्कीच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही ते म्हणाले.

Tags

follow us