Bhiwandi Mahapika Mayor : भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले आहे. नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटली यांना फक्त 16 मतं मिळाली असल्याने भिवंडीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची 6 मतं फुटली आहे. नारायण चौधरींसह (Narayan Choudhary) भाजपचे (BJP) सहा नगरसेवक फुटले असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण चौधरींसह भाजपचे सहा नगरसेवक फुटले असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून स्नेहा पाटील (Sneha Patil) यांच्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता मात्र त्यांना फक्त 16 मतं मिळाली आहे.
तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात महापालिकेत दाखल होणाऱ्या विलास पाटील (Vilas Patil) यांना 25 मतं मिळाली आहे. या निवडणुकीसाठी 10 जणांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्यापैकी 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले
The Hundred 2026 मध्ये दिसणार नाही पाकिस्तानी खेळाडू? 4 संघ मालकांनी घेतला मोठा निर्णय –
भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये 90 पैकी 30 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर या निवडणुकीत भाजपला 22 जागा जिंकता आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवला होता. शिवसेना 12 आणि समाजवादी पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या. तर भिवंडी विकास आघाडीला 4, कोणार्क विकास आघाडीला 4 आणि अपक्षला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे भिंवडी महापालिकेची सत्ता कुणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात जोराने चर्चा सुरु होती. तर आता आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी बाजी मारली आहे.
