Download App

मी त्याच वेळी बाळासाहेबांना कल्पना दिली होती; राणेंनी उलगडला ठाकरेंचा किस्सा

Narayan Rane On Uddhav Thackeray :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुंबई तर या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे व नारायण राणे यांचे वैर जगजाहीरच आहे. मला शिवसेना सोडायची नव्हती पण उद्धव ठाकरेंमुळे मला शिवसेना सोडावी लागली, असे राणे याआधीही अनेकवेळा म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा एक किस्सा सांगितला.

मी शिवसेना सोडणार होतो. त्यावेळी मी साहेबांना सांगितलं मी बाजूला होतो. मी कुठे जाणार नाही. मी माझे व्यवसाय सांभाळतो असे मी त्यांना सांगितले होते. यावर त्यांनी मला तु कुठेही जायचं नाही, असे सांगतले. कारण मी थकलो आहे, मला सोडवा असे ते म्हणाले होते. तसेच बाळासाहेब मला तेव्हा मला म्हणाले होते, मी जीवंत असेपर्यंत तुझ्यामध्ये आणि उद्धवमध्ये मला मतभेत नको आहेत, असे राणेंनी काल सांगितले.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

यावर मी साहेबांना सांगितलं की, मतभेदाचा प्रश्नच नाही. पण मला येणारे अनुभव काही चांगले नाही. तुम्ही काही झाले की उद्धवकडे पाठवता. पण त्यांच्यामध्ये समजून घेण्याची कूवत नाही आहे, असे मी साहेबांना सांगितले होते.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील भाष्य केले. एकनाथ हा माझ्यासारखा शिवसैनिक आहे. त्याची आणि बाळासाहेबांची तुलना करु नका. आता पूर्वीसारखे शिवसैनिक मिळणे कठीण आहे. त्यांच्यासारखा त्याग करणारे लोक आत मिळणार नाही. उद्धव ठाकरेही पूर्वीची शिवसेना आता घडवू शकणार नाहीत, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

Tags

follow us