Download App

Narayan Rane …असे का म्हणाले… तर लगेच इथे राजीनामा देऊन जातो!

  • Written By: Last Updated:

मुंबई : अमेरिकेच्या पर कॅपिटा इन्कम किती आहे. हे त्यांना फोन करुन विचारा, उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही. जर सांगितले तर लगेच इथे राजीनामा देऊन जातो. अडीच वर्षात काय दिवे लावले ते कळते, अशी टीका करत केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिका किंवी मुंबई दुर्लक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० हजार कोटींच्या योजनेचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे मुंबईला काही दिले नाही. या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. यापुढेही मुंबईला काहीही कमी पडणार नाही. येत्या काळात मुंबई महानगरपालिका आमच्या ताब्यात येईल. आता आमच्याकडे सरकार आहे. मुंबई जागतिक पातळीवरचं शहर आम्ही बनवून दाखवू, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

देश महासत्ता बनावा, जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जावा यासाठी भारताची अर्थव्यवस्था तशी बनवण्यात येत आहे. त्याचेच सादरीकरण अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेले आहे. या बजेटमधील प्रत्येक योजनेचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. एमएसएमईच्या बऱ्याच योजना यामध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. स्किल इंडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म या योजनांचा समावेश करुन आमच्या विभागाला प्राधान्य दिले आहे.

काही लोकं या बजेटला नावे ठेवत आहेत. तुम्ही कोणाबद्दल बोलता मला माहिती आहे. मला त्या लोकांचे नाव पण घ्यायचे नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता नारायण राणे म्हणाले की, माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना आणि एक्स्पोर्ट लोकांना एका हॉलमध्ये बोलवा. मी त्यांना यंदाच्या बजेटबद्दल सगळं समजून सांगतो. मी महाराष्ट्राचे यापूर्वी बजेट तयार केलेली आहेत. बजेटवर माझी ऐतिहासिक भाषण विधिमंडळात झालेली आहे.

Tags

follow us