Download App

Narayan Rane : उद्धव ठाकरेंना ‘बजेट’ हा शब्द लिहिता येतो का?

  • Written By: Last Updated:

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने २५ वर्षे राज्य केले. मात्र, त्यांच्या नावाला साजेशी प्रगती २५ वर्षात उद्धव ठाकरे करु शकलेले नाही. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन आहे. त्यासाठी काहीही केले नाही. त्यांच्या नावाने स्वत: चे संसार चालवले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक स्वतच्या पैशाने बनवू शकले नाही. महापूर बंगला आयता गिफ्ट घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलाल्या अर्थसंकलपावर उद्धव ठाकरेंना बोलायचा अधीकार आहे का, उद्धवला ‘बजेट’ हा शब्द लिहिता येतो का, असा सवाल केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

देश महासत्ता बनावा, जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जावा यासाठी भारताची अर्थव्यवस्था तशी बनवण्यात येत आहे. त्याचेच सादरीकरण अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेले आहे. या बजेटमधील प्रत्येक योजनेचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

नारायण राणे म्हणाले की, काही लोकं या बजेटला नावे ठेवत आहेत. तुम्ही कोणाबद्दल बोलता मला माहिती आहे. मला त्या लोकांचे नाव पण घ्यायचे नाही. माझे विनंती आहे की तुम्ही त्यांना आणि एक्स्पोर्ट लोकांना एका हॉलमध्ये बोलवा. मी महाराष्ट्राचे यापूर्वी बजेट तयार केले आहेत. बजेटवर माझी ऐतिहासिक भाषण विधिमंडळात झालेली आहे. मी त्यांना यंदाच्या बजेटबद्दल सांगतो.

 

 

Tags

follow us