Nashik TCS sexual harassment Chairman N. Chandrasekaran’s clarification : नाशिकच्या नामंकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण (Nashik Crime ) आणि धर्मांतर करण्याच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आलं. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र आता यावर कंपनीचे अध्यक्ष यांनी देखील स्पष्टीकरण देत या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली.
काय म्हणाले अध्यक्ष एन. चंद्रशेखरन?
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची टाटा सन्सने गंभीर दाखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं की, या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमन्यम यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी सुरू आहे. या तपासात कंपनी पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच या प्रकरणात काही गैर वर्तणूक आढळल्यास ते सहन केलं जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल तसेच कारवाईच्या प्रक्रियेमध्ये देखील आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून त्वरित त्याची अंमलबजावणी केली जाईल. असंही चंद्रशेखरन म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
महिलांचं शोषण प्रकरणी आधीच चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडालेली असतानाच आता नाशिक जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीयं. एका नामंकित आयटी कंपनीत महिलांचं शोषण, धर्मांतर आणि विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झालायं. महिलांचं शोषण आणि तरुणांवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलीयं. धर्मांतराचे तरुणाचे काही फोटोज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडालीयं. कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
